कोरोना विषाणू - आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे
ह्या निःशुल्क ऑनलाईन अभ्यासक्रमात कोरोना (कोविड -१९) ह्या विषाणू संबंधित आवश्यक माहितीचा समावेश आहे.
Description
हा विनामूल्य ऑनलाइन कोर्स, नोवेल कोरोना विषाणूचा इतिहास, त्याची लक्षणे, प्रसारण आणि विषाणूची रोकथाम यावर केंद्रित आहे. ज्याची पूर्वी मानवांमध्ये ओळख पटलेली नव्हती. कोरोना विषाणू (सीओव्ही) हे विषाणूचे एक मोठे कुटुंब आहे, ज्यामध्ये सामान्य सर्दीपासून मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस-सीओव्ही) आणि गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (एसएआरएस-सीओव्ही) यांसारखे गंभीर आजार उद्भवतात. कोरोना विषाणू हे प्राणि प्रसारित रोग (झुनोटिक) आहेत, म्हणजे ते प्राणी आणि मानव यांच्यात संक्रमित होतात.
ह्या अभ्यासक्रमात, विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास त्याद्वारे संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर कशाप्रकारे गंभीर परिणाम होतो आणि ज्या समुदायांत आणि देशात याचा उद्रेक होतो अशा देशांच्या आरोग्याच्या संसाधनांवर होणारे दुष्परिणाम कोणते यावर चर्चा होईल. संसर्गाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, श्व़ास लागणे आणि श्व़ास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, संसर्गामुळे निमोनिया, तीव्र श्व़सन सिंड्रोम, मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यू देखील होतो.
हा कोर्स एक अनोखा उपक्रम आहे, जो जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), जिनेव्हा, स्वित्झर्लंड आणि सीडीसी (सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल, यूएसए) द्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम (साथीचा रोग) जागतिक महामारी असलेल्या आजारावर जलद प्रतिसाद ग्लोबल लर्निंग सर्टिफिकेशन सिस्टम विकसित करण्याच्या नाविन्यपूर्ण अॅलिसन उपक्रमाचा एक भाग आहे. हा विनामूल्य कोर्स दररोज अद्यतनित केला जाईल आणि 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध होईल. विषाणू आणि त्यापासून होणार्या धोक्यांबद्दल ज्ञान जागरूकता आणि समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, अॅलिसनने पीडीएफ प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील जगभरात विनामूल्य उपलब्ध करुन दिला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, नोवल कोरोना विषाणूमुळे आपल्यास आणि इतरांना असलेल्या धोक्यांचा चांगल्याप्रकारे कसा सामना करता येईल याबद्दल आपण स्वतःला अद्यतनित ठेवू शकाल. मग, प्रतीक्षा कसली ? आजच हा अभ्यासक्रम सुरू करा आणि 1-2 तासाच्या अभ्याक्रमात आपण आपले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या समुदायाचे संकुचित आणि संक्रमित अशा नोवेल कोरोना विषाणू पासून संरक्षण करण्यास मदत करण्यासाठीचे ज्ञान प्राप्त केले असेल.
Start Course Now